logo

लोकमान्य विद्यालयात फिरती प्रयोगशाळा

लोकमान्य विद्यालयात फिरती प्रयोगशाळा

अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर या शाळेत शनिवार दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान या विषयासाठी मोबाईल सायन्स एक्जीबिशन युनिट म्हणजेच फिरती प्रयोगशाळेतील विविध प्रयोग दाखवण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान विषयांतर्गत वेगवेगळे प्रयोग स्वतः अनुभवता आले. त्या प्रयोगात मागील असणारी कारणं विद्यार्थ्यांना स्वतः अनुभवायला मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोगांच्या मनसोक्त आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हे प्रयोग पाहताना वेगळ्या प्रकारचे कुतूहल आणि जिज्ञासा दिसून आले. यावेळी प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.डाॅ.एल.ए पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे भूविज्ञान विभागाचे प्रा.डॉ.भावेश दिनू पाटील, तसेच विद्यार्थी दीपक तायडे, राहुल हजारे, मयुरी गिरासे, अक्षय सैंदाणे, गोरख बोरसे याचबरोबर लोकमान्य शिक्षण मंडळाचे चिटणीस विवेकदादा भांडारकर, लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डाॅ.प्रभाकर जोशी, संस्थेचे कार्योपाध्यक्ष राजाभाऊ खाडिलकर तसेच लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.चौधरी विद्यालयाचे उपशिक्षिका मनिषा खांजोडकर, सायली देशपांडे उपशिक्षक मनोहर महाजन, भूषण महाले सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

1
12 views