दापोडीत नवरात्र उत्सवात "नवदुर्गा गौरव पुरस्कार 2025" ने महिलांचा सन्मान
दापोडीत नवरात्र उत्सवात "नवदुर्गा गौरव पुरस्कार 2025" ने महिलांचा सन्मान
दापोडी येथे नवरात्र उत्सवानिमित्त कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान आणि तीर्थराज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. "नारी तू नारायणी, नारी तू सबला – तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला" या प्रेरणादायी मंत्रासह महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
"नवदुर्गा गौरव पुरस्कार 2025" द्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये शिक्षिका, पोलीस, डॉक्टर, वकील, नर्स, खेळाडू, गृहिणी आणि उद्योजिका अशा अनेक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा समावेश होता.
या सन्मानप्राप्त महिलांना माधवी बाईत आणि सीमा यादव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
सन्मानित महिला: वंदना ठोक, सुनिता कुंभार, सुरेखा मोरे, अस्मिता कांबळे, संगीता पाचंगे, सारिका जाधव, उषा यादव, सुमन यादव, वैशाली शेळके, इस्सर यादव, नीलिमा सोनवणे, उमा यादव.
उपस्थित मान्यवर व महिला: पूजा काटे, वैशाली जाधव, अश्विनी काटे, गायत्री शिवले, रोहिणी काटे, कीर्ती पवार, लीना जाधव, मनीषा मोरे, हेमा काटे, सुनिता जाधव, प्राची मोरे, कोमल जाधव, ऋतुजा जाधव, सुजाता बोधे, रेश्मा काटे, राणी कांबळे, अनित जयकरण, राधा नरेंद्रसिंग, आभा रविंद्रसिंह, पुष्पा यादव, संगीता यादव, वृषाली पायगुडे, शीतल सरडे, सुशीला पवार, स्नेहा कांबळे व इतर मान्यवर महिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रचना शिवले यांनी केले.
हा कार्यक्रम महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव ठरला असून, समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा प्रेरणास्रोत ठरला आहे.