logo

घणसोलीत मुकाम्बिका देवी मंदिराजवळ भाविकांची रस्त्यावर गर्दी: अपघात होण्याची मोठी शक्यता

​घणसोली, नवी मुंबई - ३० सप्टेंबर, २०२५
​नवी मुंबईतील घणसोली, सेक्टर २ येथील श्री मुकाम्बिका देवालयाच्या ५३ व्या नवरात्री उत्सवामुळे काल (सोमवार, २९ सप्टेंबर) झालेल्या गर्दीमुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण रस्ता व्यापला गेला होता, परिणामी मोठा अपघात होण्याची शक्यता होती.
​मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात केलेली आकर्षक सजावट आणि नेत्रदीपक लाइटिंगमुळे भाविक भारावून गेले होते. याच सजावटीच्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढण्याच्या नादात तसेच महाप्रसादाच्या लाईनमुळे भाविक कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी न घेता सरळ रस्त्यावर थांबून सेल्फी काढण्यात व्यस्त होते. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना खूप त्रास सहन करावा लागला आणि परिसरात वाहतूक कोंडी झाली. रस्ता पूर्णपणे अडवून धरल्याने वाहन चालकांना मार्ग काढणे अत्यंत कठीण झाले होते.
​नवरात्री आणि दसरा सण संपेपर्यंत दररोज सायंकाळच्या वेळी अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
​या धोकादायक परिस्थितीवर चिंता व्यक्त करत चिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना दत्तात्रय काळे यांनी भाविकांना व नागरिकांना विशेष आवाहन केले आहे.
​दत्तात्रय काळे म्हणाले, "एखाद्या वेळेस वाहतुकीदरम्यान कोणा थांबलेल्या व्यक्तीला दुखापत झाली असती, तर याचे परिणाम खूप गंभीर आणि महागात पडले असते. कुठल्याही देवाला दर्शनाला जात असताना, भाविकांनी सेल्फीच्या नादात स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर थांबणे पूर्णपणे टाळावे." नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
​रस्त्यावर थांबल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात लक्षात घेऊन, भाविकांनी यापुढे गर्दीच्या व्यवस्थापनाचे भान ठेवावे, तसेच प्रशासनाने तात्काळ वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांची नेमणूक करून यावर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी चिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना दत्तात्रय काळे यांनी केली आहे.
​📢 बातमी प्रसिद्धी आणि जाहिरातीसाठी संपर्क:
दत्तात्रय तुकाराम काळे
(चिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना)
(सामाजिक मीडिया कार्यकर्ता, एआयएमए मीडिया फाउंडेशन प्रतिनिधी)
मोबाईल: ८०८००७६२६२

57
1954 views