logo

आवाड शिरपुरा येथे पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोफत के वाय सी शिबीर

जिल्हा प्रतिनिधी :- (विकास वाघ धाराशिव)
*१७७ शेतकऱ्यांनी घेतला लाभ – कै. अहिल्याबाई अंबाजी पवार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम*
प्रतिनिधी :- विकास वाघ
कळंब तालुक्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे मांजरा धरणाला आलेल्या पुरामुळे आवाडशिरपूरा परिसरातील शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने आर्थिक नुकसान झालेच, पण याहून मोठे संकट म्हणजे शेतकरी बांधवांचा धाराशिव जिल्ह्याशी संपर्क पूर्णतः तुटला. शासनाच्या विविध योजना आणि मदतीपासून वंचित राहण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली होती.
ही परिस्थिती ओळखून कै. अहिल्याबाई अंबाजी पवार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, शिराढोण तर्फे गावातच मोफत KYC शिबिराचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या अनुदानासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया थेट गावाच्या पातळीवर आणल्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
*शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
या शिबिरात तब्बल १७७ शेतकऱ्यांनी मोफत KYC करून घेतली. गावातील तरुण, वयोवृद्ध आणि महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पूर्वी शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दूरवर जावे लागे, तासन्तास रांगा लावाव्या लागत आणि अनेकांना परत परत पायपीट करावी लागत होती. परंतु या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना गावकुसातच शासनाच्या मदतीसाठी प्रवेशद्वार खुलं झालं.
*मान्यवरांची उपस्थिती व सहकार्य*
संस्थेचे अध्यक्ष अविनाश पवार आणि सचिव आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. गावचे सरपंच गोविंद आवाड, सामाजिक कार्यकर्ते सुजय काळदाते, तसेच इतर मान्यवर व समाजबांधव उपस्थित राहून त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.
सरपंच गोविंद आवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, "पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदानासाठी गावातच सुविधा उपलब्ध करून देणे हा खरंच अभिनव उपक्रम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसू लागला आहे."
*शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य*
मोफत शिबिरामुळे शेतकऱ्यांना होणारी पायपीट टळली आणि त्यांचा वेळ तसेच खर्च वाचला. गावातील वयोवृद्ध शेतकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना म्हटले की, "आता आम्हालाही शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सोपे झाले आहे."
या उपक्रमामुळे गावातील सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलाश्याचे आणि आनंदाचे हास्य उमटले.
*ग्रामस्थांचे आभार प्रदर्शन*
पूरग्रस्त शेतकऱ्यांना गावा

च KYCची सुविधा मिळाल्याने ग्रामस्थांनी कै. अहिल्याबाई अंबाजी पवार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे मनापासून आभार मानले. त्यांच्या मते, "ही संस्था म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची सावली आणि आधारवड आहे."
या शिबिरामुळे शेतकऱ्यांना हक्काच्या अनुदानाची दारे खुली झाली असून गावाच्या इतिहासात हा दिवस दिलासा देणारा आणि प्रेरणादायी

6
2649 views