
जनता विद्यालयात स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्तानेशाळा समिती तथा शाळा विकास समितीची बैठक संपन्न
पिंपळगाव सराई, दि. २७ सप्टेंबर २०२५ (शनिवार) रोजी जनता विद्यालयात स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने शाळा विकास समिती तसेच विद्यार्थी संसद व शालेय मंत्रिमंडळाची संयुक्त बैठक संपन्न झाली.
या बैठकीस शाळा समितीचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे प्रमुख उपस्थित होते. यावेळी संस्थेचे मा. संचालक सहदेवराव सुरडकर, अरुणजी लाहोटी, डॉ. भूषणजी डागा, स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुभाषजी बारस्कर, शाळेचे प्राचार्य व समितीचे सचिव प्रमोदजी ठोंबरे, पर्यवेक्षक संजय पिवटे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेविषयी सजगता वाढावी तसेच शाळा व परिसर स्वच्छ राहावा या उद्देशाने पुढील ठराव एकमुखाने करण्यात आले
शाळेने वर्षभर विविध स्वच्छता जनजागृती कार्यक्रमांना पुढाकार घ्यावा.
विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा.
परिसरातील नागरिकांनाही स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी विशेष मोहिमा राबवाव्यात.
या ठरावामुळे स्वच्छ शाळा, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ गाव या उद्दिष्टपूर्तीकडे शाळेचा महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.