
थेपडे विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात साजरे
आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद ता जि जळगाव मध्ये शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.पी.डी चौधरी सर अध्यक्षस्थानी होते तसेच उपप्राचार्य श्री.जी.डी बच्छाव सर, पर्यवेक्षक श्री. के पी. पाटील सर ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एम. नेतकर सर श्री.एस. जे. पवार सर व विज्ञान मंडळ प्रमुख सौ . योगिता पाटील मॅडम या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री.पी.डी चौधरी सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थांना वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्या बाबत मार्गदर्शन केले व शाळेचे उपप्राचार्य आदरणीय श्री जी.डी . बच्छाव सर यांनी देखील विद्यार्थ्यांना शोध व संशोधक यांच्या बद्दल मार्गदर्शन केले. विज्ञान प्रदर्शन दोन गटात घेण्यात आले इयत्ता 5 वी ते 8 वी लहान गट या गटातून एकुण 30 प्रोजेक्ट तयार करण्यात आले होते , व मोठा गट इयत्ता 9 वी ते 10 वी या गटातुन 15 प्रोजेक्ट तयार करण्यात आले होते .एकूण 45 प्रोजेक्ट विद्यार्थांनी बनविले व काही विद्यार्थीनींनी विज्ञान रांगोळ्या देखील काढल्या. प्रदर्शन पाहण्यासाठी इंग्लीश मेडीअम येथील विद्यार्थी व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील हजेरी लावली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . एम. ए. जैन सर यांनी केले व प्रस्तावना श्री.एस. व्ही.दुकळेसर यांनी केली आभार प्रदर्शन श्रीमती. योगिता पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. डी. एम. सोनवणे सर ,श्री. वाय .एन शिंदे सर,श्री.एस. आर पवार सर श्रीमती. वैशाली सूर्यवंशी मैडम व सर्व विज्ञान विषय शिक्षक बंधु भगीनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगीनी यांनी सहकार्य केले अशा प्रकारे विज्ञान प्रदर्शन उत्साहात साजरे झाले.