logo

जनता विद्यालयात स्वच्छता पंधरवडा निमित्त विद्यार्थी संसद तथा शालेय मंत्रिमंडळ बैठक संपन्न


पिंपळगाव सराई, ता. बुलडाणा –
जनता विद्यालयात स्वच्छता पंधरवडा निमित्त दिनांक २९ सप्टेंबर २०१५ रोजी विद्यार्थी संसद तथा शालेय मंत्रिमंडळाची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीचा प्रमुख विषय “स्वच्छता पंधरवडा” होता.

या बैठकीस शालेय मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री हर्षल महिंद्रकर, उपमुख्यमंत्री कु. सेजल तरमळे, तसेच शाळेचे प्राचार्य प्रमोदजी ठोंबरे प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्रा. सुधाकर सस्ते, विज्ञान शिक्षक सुहास कुलकर्णी, सतिष शेटे व प्रयोगशाळा सहाय्यक राजेंद्र भवरही उपस्थित होते.

बैठकीत स्वच्छतेसाठी दररोज विशेष पथकाची नेमणूक, वर्गनिहाय स्वच्छ वर्ग स्पर्धा घेणे, शालेय आवारातील झाडांना पाणी देऊन परिसर हिरवागार ठेवणे, प्लास्टिक वापर कमी करण्याबाबत जनजागृती करणे, विद्यार्थ्यांकडून स्वच्छता प्रतिज्ञा घ्यावी अशा ठोस निर्णयांवर चर्चा झाली. तसेच वर्षभरात निबंध, चित्रकला, घोषवाक्य लेखन, लघुनाट्य यांसारखे उपक्रम राबविणे व गावामध्येही स्वच्छतेचे जनजागरण करण्याचे ठरले.

मान्यवरांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सांगितले की, स्वच्छता हीच खरी सेवा असून निरोगी समाज घडविण्यासाठी ती अत्यावश्यक आहे.

बैठकीच्या शेवटी शालेय मुख्यमंत्री हर्षल महिंद्रकर याने सर्वांचे आभार मानून बैठक संपन्न झाल्याचे जाहीर केले.

42
122 views