आज ग्रुप ग्राम पंचायत मोरांबा येथे आदि कर्मयोगी अभियान शिवार फेरी कार्यक्रम गट विकास आधिकारी लालू पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न
अक्कलकुवा प्रतिनिधी :(गंगाराम वसावे )
आज ग्रुप ग्राम पंचायत मोरांबा येथे आदि कर्मयोगी अभियान शिवार फेरी कार्यक्रम अक्कलकुवा पंचायत समिति चे गट विकास अधिकारी लालू पावरा यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न
आज आदी कर्मयोगी अभियानात अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. लालू पावरा यांनी ग्रुप ग्रामपंचायत मोरांबा येथे ग्रामस्थाना मार्गदर्शन केले. सदर अभियान आदिवासी समाजासाठी वरदान असल्याचे यावेळी आपले मत व्यक्त केले सदर कार्यक्रमाला उपस्थित गटविकस अधिकारी श्री लालू पावरा ग्रामपंचायत अधिकारी वनसिंग वसावे लोकनियुक सरपंच रायलीबाई वळवी, उप सरपंच अरविंद वसावे तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य व पोलिस पाटील गणेश वसावे,राजेश वसावे, रोजगार सहायक पृथ्वीराज वसावे , मोजनु वसावे,आंगणवाडी सेविका, आशा सेविका व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते