logo

संतप्त नागरिकांनी केली मंत्रालयात तक्रार


देवळी :
देवळी नगरपरिषदेमध्ये सुरू असलेल्या अनियमितता, नागरिकांना आवश्यक माहिती न देणे तसेच प्रशासनाच्या कामकाजातील ढिलाई या सर्वांविरुद्ध संतप्त नागरिकांनी थेट मंत्रालयात धाव घेतली आहे.

नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई येथे नागरिकांनी सविस्तर तक्रार नोंदवून, देवळी नगरपरिषदेतील नियमबाह्य कार्यपद्धती व जनतेला होत असलेल्या गैरसोयींचा पाढा मांडला आहे.

या तक्रारीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, नगरपरिषदेकडून माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागवलेली माहिती वेळेवर उपलब्ध करून दिली जात नाही. नागरिकांच्या हक्काची माहिती दडपून ठेवत प्रशासन अपारदर्शक पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांनी केलेल्या या थेट कारवाईमुळे देवळी नगरपरिषद प्रशासनावरील जनतेचा रोष उघड झाला असून, मंत्रालयीन स्तरावर या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

25
3977 views