logo

अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या उपस्थितीत भव्य दंतरोग व सर्व रोग निदान शिबिर कार्यक्रम संपन्न

अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या उपस्थितीत भव्य दंतरोग व सर्व रोग निदान शिबिर कार्यक्रम संपन्न
अक्कलकुवा प्रतिनिधी ( गंगाराम वसावे)
दिनांक 30/09/2025 रोजी स्वस्थ भारत सशक्त परिवार अभियान अंतर्गत अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात भव्य दंतरोग व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना आमदार आमश्या दादा पाडवी यांनी सांगितले की, आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली तर आरोग्य व्यवस्थित राहते.कोणतेहि व्यसन वाईटच असते त्यामुळे व्यसनापासून लांब रहा तसेच मतदार संघात बोगस डॉक्टरांवर आळा घातला पाहिजे*
*यावेळी आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजेश वसावे यांनी केले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विनय सोनवणे,, डॉ धृवराज वाघ,शिवसेना जिल्हा उपप्रमुख मगन वसावे, पृथ्वीसिंग दादा पाडवी,प्रा दिनेश खरात, रविंद्र चौधरी, प्रकाश पाडवी, रोहित चौधरी, सुनिता पाडवी,सरला वळवी, सरपंच दुर्गाताई पाडवी, निता पाडवी,जामिया चे संचालक सुलेमान रंधेरा, तालुका प्रमुख तुकाराम वळवी, इम्रान पठाण, यशवंत नाईक,शहर प्रमुख रावेद्र चंदेल, प्रकाश खिची, वैद्यकीय अधिकारी डॉ जर्मनसिंग पाडवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अजित कोठारी, लोकसभा प्रसिध्दी प्रमुख हुजेफा बलोच , अविनाश बिराडे, डॉ महेश कुंवर,शुभम गुरव,आमदार आमश्या दादा पाडवी यांचे स्विय सहाय्यक रविंद्र गुरव आदि उपस्थित होते कार्यक्रमांचे सुत्रसंचलन अश्विनी मोहिते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ नरेश पाडवी यांनी केले*

2
389 views