
विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करा ः अ.भा.वि.प.ची स्वारातीम विद्यापीठाकडे मागणी
नांदेड, दि.१ ः राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरे, शाळा, महाविद्यालये, शेती आणि जीवनावश्यक वस्तूंचा नाश झाला आहे. आपल्या विद्यापीठ परिक्षेत्रातील येणारे लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत अत्यंत भयाण परिस्थिती उद्भवली आहे, आज लोकांच्या डोळ्यासमोर रोजच्या जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यात बहुतांश पिडीत हि आपल्या विद्यापीठ व अंतर्गत येणाऱ्या महाविद्यातील शिक्षण घेणारी विद्यार्थी देखील आहेत,त्यामुळे अभाविप च्यावतीने विद्यापीठ प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले. यात पुढील मागण्यांचा समावेश आहे.
मागण्या :
१. यावर्षी विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क पूर्णपने माफ करून विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा, तसेच विद्यार्थ्यांची यावर्षीची शैक्षणिक शुल्क देखील पूर्णपणे माफ करावे.
२. विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज भरण्याच्या तारीखेमध्ये मुदतवाढ द्यावी.
३. विद्यापीठ युवक महोत्सव मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदत वाढ करावी.
अशी मागणी अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री प्रवीण पांडे, महानगरमंत्री ऋषिकेश काळे यांनी केली, यावेळी शुभम स्वामी, दीपाली चित्ते, धनराज जोशी, वेदांत पाठक हे उपस्थित होते.