logo

ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी मा. सोनाली मोहन पवार यांची निवड

ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी मा. सोनाली मोहन पवार यांची निवड
पुणे निवासी संपादक उमेश पाटील
085306 64576
पिंपरी चिंचवड : समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढा देणे, मानवाधिकारांचे संरक्षण करणे आणि सामाजिक विकासासाठी कार्य करणे या उद्दिष्टांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी पिंपरी चिंचवडच्या मा. सोनाली मोहन पवार यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. कैलास गहिनीनाथ बनसोडे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. समाजकार्याचा दांडगा अनुभव, संघटन कौशल्य, कार्यतत्परता आणि सामाजिक भान लक्षात घेऊन पवार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सोनाली पवार यांनी आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रमांतून महिलांचे सबलीकरण, युवकांना दिशा देणे, वंचित घटकांसाठी शैक्षणिक व आरोग्य विषयक जनजागृती अशा अनेक क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्याचा योग्य सन्मान म्हणून त्यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या निवडीनंतर संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी यांनी पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

0
99 views