
घरकुल लाभार्थ्यांना अतिक्रमण नियमनाच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा*
* सिंदखेड राजा |न्यूज रिपोर्ट जाकिर खान
दि. 24 सप्टेंबर 2025
साखरखेर्डा येथील घरकुल लाभार्थ्यांनी त्यांच्या हक्काच्या घरासाठी प्रशासनाकडे पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली आहे. *पत्रकार असलम अंजुम मो. बशीर (माजी उपसरपंच, साखरखेर्डा)* आणि *मोहम्मद फयाज मो. शरीफ*, यांनी *उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा* यांच्याकडे लेखी निवेदन सादर करत *दि. 29 सप्टेंबर 2025 पासून बेमुदत आमरण उपोषणास* बसण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, साखरखेर्डा येथे घरकुल मंजूर असूनही, *सरकारी जागेवर वास्तव्यास असलेल्या लाभार्थ्यांचे अतिक्रमण अद्याप नियमबद्ध करण्यात आलेले नाही*. यामुळे संबंधित लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही, आणि ते न्यायापासून वंचित राहत आहेत.
या संदर्भात प्रशासनाच्या विविध स्तरांवर वेळोवेळी निवेदने सादर करून देखील कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता हे प्रश्न सोडवण्यासाठी *आमरण उपोषणाचा मार्ग* स्वीकारण्यात येत आहे.
*प्रतिलिपी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे*, ज्यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस ठाणेदार, व सरपंच यांचा समावेश आहे.