logo

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी वन मंत्र्याची घेतली भेट....!

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी राज्याचे वन मंत्री मा.श्री गणेश नाईक यांची भेट घेतली .
पाचोरा प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना जंगलातील हिंस्त्र प्राण्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे तसेच पाळीव प्राण्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर तोडगा म्हणून मतदारसंघातील वनक्षेत्रातील जमिनींना कंपाऊंड करण्याची मागणी शेतकरी बांधवांकडून सातत्याने होत आहे.

या गंभीर प्रश्नाचा विचार करून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी राज्याचे वने मंत्री मा.ना. श्री. गणेश नाईक साहेब यांची वेळ घेऊन मंत्रालय येथे विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीस सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कंपाऊंड बांधकामासंदर्भात तसेच वन विभागाशी निगडित इतर प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा झाली.

या चर्चेत वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी सकारात्मक पवित्रा घेत, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शेतीपिकांच्या रक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील व कंपाऊंडचे काम लवकरच मार्गी लागेल असे स्पष्ट आश्वासन दिले.

मतदारसंघातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा मला विश्वास आहे.

0
0 views