logo

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आंदोलन – “पिक नाही तर पंचनामे कसले करता " संतप्त शेतकऱ्यांचा सवाल.

प्रतिनिधी विश्वनाथ भगत :- राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचा फटका हिंगोली जिल्ह्यालाही बसला आहे. गोरेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली, घरांची पडझड झाली तर शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी गोरेगाव–जिंतूर महामार्ग आडवून तीव्र आंदोलन छेडले.

या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी स्वतःचे सरण रचून पेटविण्याचा प्रयत्न केला. महामार्गावरील कन्हेरगाव नाका ते येलदारी मार्गावर शेतकरी पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी “५० हजार रुपये हेक्टरी मदत द्या, पूर्ण पीकविमा मिळवा, कर्जमाफी द्या” अशा जोरदार घोषणा दिल्या.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कव्हरखे यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी संतप्त शब्दात प्रश्न उपस्थित केला की, “शेतात पिकच शिल्लक नाही तर पंचनामे कसले करणार? सरकारने तात्काळ संपूर्ण भरपाई द्यावी.”

शेतकऱ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनाला धाव घ्यावी लागली असून, मदतीच्या मागण्यांवर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0
2 views