logo

पं.स. सभापतिपदासाठी ९ रोजी आरक्षण सोडत





जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे

आरक्षण काढल्यानंतर आता जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत मंगळवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या समक्ष काढण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या नजरा आता आरक्षणाकडे लागल्या आहेत.

राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीची आरक्षण सोडत १२ सप्टेंबर रोजी जाहीर झाली होती. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले. त्यामुळे अन्य संवर्गातील उमेदवारांचा हिरमोड झाला. त्यात काहींनी आता पंचायत समितीच्या सभापतिपदावर डोळा ठेवला आहे. ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात १५ पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

12
593 views