
कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती न्यू इंग्लिश स्कूल, पळशी येथे उत्साहात साजरी
पळशी (ता. खंडाळा) : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक क्रांतीचे खरे प्रणेते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांच्या 138 व्या जयंतीनिमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, पळशी येथे दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खंडाळा तालुक्याचे नायब तहसीलदार माननीय श्री स्वप्निल खोल्लम साहेब यांनी भूषविले. प्रमुख मान्यवर म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सातारा व विद्यमान संचालक खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना खंडाळा चे माननीय श्री नितीनकुमार लक्ष्मणराव भरगुडे पाटील, ग्रामपंचायत पळशीच्या सरपंच सौ. हेमाताई हनुमंत गायकवाड, उपसरपंच सौ. कविता किरण राऊत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटी पळशीचे अध्यक्ष श्री नवनाथ शंकर भरगुडे, तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अॅड. अजितराव भरगुडे पाटील, श्री विलास सर्जेराव चव्हाण, मान्यवर नागरिक व पालक उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री तुकाराम दिनकर लकडे सर जेष्ठ शिक्षक श्री काळे एस. ए. वरिष्ठ लेखनिक श्री भिलारे एस. पी. सौ. कुदळे डी. व्ही.
श्री किरवे एच .एस . श्री जानकर एन .एम . आर.एस.पी. प्रमुख श्री वसावे ए.डी.सौ पोतदार ए.एस. कु. चावके डी. वाय श्री पवार ए.एस.व शिंदे एस. व्ही . यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी बोलताना नायब तहसीलदार श्री स्वप्निल खोल्लम साहेब म्हणाले,
"सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे खरे प्रणेते म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील होय. त्याकाळी दूरदृष्टी दाखवत त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि ग्रामीण भागात हजारो शाळा उभारल्या. या शाळांमधून लाखो विद्यार्थी घडले. साधनसुविधा नसताना कर्मवीरांनी पायपीट करून ज्ञानगंगा झोपड्यांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीत रयत शिक्षण संस्थेचा सिंहाचा वाटा आहे."
खोल्लम साहेबांनी अभिमानाने सांगितले की, ते स्वतः रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. पुढे ते म्हणाले की,
"महामानवांच्या जयंती-पुण्यतिथी साजऱ्या करण्यामागचा हेतू म्हणजे त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणे हा आहे. विद्यार्थी मित्रांनी कर्मवीरांचे चरित्र वाचावे, प्रेरणा घ्यावी आणि समाजासाठी काहीतरी घडवावे."
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, गरीब कुटुंबातून येऊन शिक्षणाच्या बळावर यश मिळवता येते. "मीसुद्धा माझ्या गावात रयत शिक्षण संस्थेमुळे शिकलो आणि आज तुमच्यासमोर अधिकारी म्हणून उभा आहे. तुम्हीही मेहनत करून पुढे चला," असे त्यांनी सांगितले.
तसेच, ए. आय. (Artificial Intelligence) अभ्यासक्रम सुरू करणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
प्रमुख उपस्थित मान्यवर श्री नितीनकुमार भरगुडे पाटील यांनी कर्मवीरांच्या जीवनपटाचे तपशीलवार वर्णन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, नायब तहसीलदार खोल्लम साहेबांचा आदर्श घेऊन पळशी गावातील विद्यार्थीही अधिकारी होऊन गावाचे नाव उज्ज्वल करावेत.
मुख्याध्यापक श्री लकडे सर यांनी प्रास्ताविकात शाळेची स्थापना, शाखा विस्तार व रयत शिक्षण संस्थेचे विविध उपक्रम यांची माहिती दिली.
कार्यक्रमात विद्यार्थिनी कुमारी शर्वरी दगडे हिने कर्मवीरांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
आर.एस.पी. च्या विद्यार्थ्यांनी केलेले संचलन आकर्षण ठरले व मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री हेमकांत शंकरराव किरवे सर .
तर आभारप्रदर्शन सौ. कुदळे मॅडम यांनी मान्यवर व उपस्थितांप्रती व्यक्त केले.