logo

*राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

डॉ. एस राधाकृष्णन कॉलेज ऑफ एज्युकेशन साकोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी छात्र अध्यापिका धनश्री वंजारी, प्रीति सोनवणे, लेनिन टेंभुर्णे, संजीवनी बावनकुळे, यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित श्री. राजेंद्र मांदाळे, ता. नि. अद्यापक विद्यालय साकोली, यांनी महापुरुषांचा अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने दिलेला लढा छात्र अध्यापकांसमोर ठेवला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. अक्षय पुस्तोडे यांनी महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर सखोल प्रकाश टाकला. महापुरुषांच्या प्रेरक व्यक्तिमतत्वाबद्ल मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनातील मुल्यांचा स्वीकार केल्यांस आपले लोकतंत्र कशाप्रकारे मजबूत करता येईल. याप्रसंगी त्यांनी त्याग आणि नैतिक मूल्यांचे जीवनातील महत्त्व याविषयी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी महापुरुषांच्या जीवनातील अनेक प्रेरक प्रंसग सर्वांसमोर ठेवले. जयंतीच्या प्रसंगी मार्गदर्शकांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या जीवनावरील वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, तसेच निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण सुद्धा करण्यांत आले.
प्रस्तुत कार्यक्रमाला संचालन छात्र अध्यापिका सुजाता राऊत तसेच आभार प्रदर्शन आदर्श शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी वैष्णव जन तो तेने कहिये या गांधीजींच्या प्रसिद्ध भजना द्वारे कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. याप्रसंगी प्रा. चेतन कापगते, प्रा. मृणालिनी बावनकर, श्री सचिन खोब्रागडे, तसेच सर्व बीएड प्राध्यापक, छात्र अध्यापक तसेच छात्र अध्यापिका यांचे सहकार्य लाभले

39
4737 views