
युवा नेते दिपक भाऊ चौधरी यांची भाजपा जिल्हा कार्यकारिणीत वर्णी...
विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील
भाजपाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.ना.श्री. जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाने आणि जिल्हाध्यक्ष श्री.बापूसाहेब खलाणे यांच्या आदेशाने शिंदखेडा येथील युवा नेते व लोकप्रिय नगरसेवक श्री. दिपकभाऊ चौधरी यांची भाजपा धुळे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र मा.ना. श्री.जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते श्री.दिपकभाऊ चौधरी यांनी स्विकारले. या प्रसंगी भाजपाचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस श्री.डी. एस. गिरासे, गटनेते श्री.अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष श्री. प्रकाश देसले, जिल्हा चिटणीस श्री प्रविण दादा माळी, माजी नगरसेवक श्री. चेतन परमार, माजी शहराध्यक्ष अॅड. श्री.विनोद पाटील, श्री.सुयोग भदाने, श्री.मनोज भामरे यांच्यासह इतर भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजप संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी दिपकभाऊंच्या नियुक्तीचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. पक्षवाढीसाठी श्री.दिपक भाऊ चौधरी यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.