logo

लेंडी प्रकल्प बाधित पूरग्रस्त हसनाळ (पमु) पिडितांचे दुःख जाणून घेऊन सुजात आंबेडकर यांचा सरकारवर संतप्त सवाल...


मुखेड तालुक्यातील मौजे हसनाळ( पमु) पूरग्रस्त गावातील पिडितांची भेट तसेच जिल्ह्यातील सर्वाधिक जीवित हानी झालेले गाव म्हणून या गावाची नोंद आहे, त्यामुळे अनेकांनी दानशूर व्यक्तींनी तसेच वेगवेगळ्या संस्थेने गावकऱ्यांना आपापल्या माध्यमातून वैयक्तिक मदत केलेली आहे त्यामध्ये संसार उपयोगी साहित्य, अन्नधान्याची किट असे विविध मान्यवरांनी गावकऱ्यांना सहानुभूतीची लाट दाखवत मदत केली, काही राजकीय नेत्यांनी मृत कुटुंबातील वारसांना आर्थिक मदत दिली , तसेच राज्यातील विविध राजकीय पटलातील मान्यवर आले त्यामध्ये राज्याचे आपत्ती व्यवस्थापन ना. गिरीश महाजन यांनी भेट देऊन पूरग्रस्त मृत्यू पावलेल्या कुटुंबातील वारसांना शासकीय मदत केली तसेच नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी पूरग्रस्तातील पिढीतांचे दुःख जाणून घेऊन मदत केली, तसेच भाजपचे आ. डॉ. तुषार राठोड यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली. सत्ताधारी, विरोधी पक्ष नेते सर्वांनी आपल्या माध्यमातून पाहाणी दौरा करून पूरग्रस्तातील पिढीतांचे दुःख जाणून घेतले; परंतु अद्यापपर्यंत पुरामध्ये बाधित कुटुंबाला
मिळणारी शासनाची प्राथमिक मदत गरजवंतापर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये सरकारविरुद्ध तीव्र संतापाची लाट पहावयास मिळत आहे. बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर साहेब यांनी हसनाळ वासियांचे दुःखद भावना जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष गावभेटी पाहणी दौरा केला.

यावेळी सुजात आंबेडकर यांनी सरकारच्या तुटपुंजी पूरग्रस्त मदत धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला, यामध्ये त्यांनी गावकऱ्यांच्या दुःखद
वेदना त्यांच्यासोबत आम्ही आहोत असे व्यक्त केले त्याबरोबर गावात मागच्या दोन महिन्यांपासून सतत पूर परिस्थिती यामुळे गावकऱ्यांचे दैनदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे, यासाठी स्थलांतरित पुनर्वसन ठिकाणी शासनाच्या प्राथमिक सोयी सुविधा बाबत आतापर्यंत झालेल्या कायार्चा आढावा त्यांना सांगण्यात आला व शासनातर्फे तात्काळ पायाभूत सुविधा मूलभूत दळणवळण वाहतुकीसाठी पक्के रस्ते, नितांत गरजेचे असल्याचेही आपल्या भावना व्यक्त केला. मागासवर्गीय समाजातील तरुणांनी सरसकट पिढीत कुटुंबांना शासनाने दिलेले प्राथमिक रक्कम म्हणून दहा हजाराचे चेक हे देत असताना दुजाभाव करण्यात आला त्यामुळे सर्वांनी सरसकट मूळ कुटुंबातील बाधितांना मदत करण्याची मागणीसाठी युवकांनी साकडे घातली.

पुढे बोलताना त्यांनी शासकीय पुनर्वसन ठिकाणी शासनाच्या घरकुल योजना मार्फत पक्के घर संदर्भात वरिष्ठांकडे चर्चा करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी घरे व सोयी सुविधा या प्रमुख मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी आमची नांदेड जिल्ह्याची वंचित बहुजन आघाडी ची टीम पाठपुरावा करेल. असे आवाहन आंबेडकरांनी केले.

9
65 views