वैशाली बुद्ध विहारामुळे एक नवीन आध्यात्मिक आणि सामाजिक केंद्र उपलब्ध होणार - असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
विशेष प्रतिनिधी शिवाजी श्रीमंगले
(शिरूर ता).
आज अहमदपूर तालुक्यातील आजनी खुर्द या गावामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभमुहूर्तावर वैशाली बुद्ध विहारच्या भूमीपूजनाचे समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या भूमिपूजनास सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन समारंभ झाले व बुद्ध विहार लवकरात लवकर पूर्ण होईल , या विहारामुळे परिसरातील नागरिकांसाठी एक नवीन आध्यात्मिक आणि सामाजिक केंद्र उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी येथे केले आहे. व या भूमिपूजन समारंभाचे अध्यक्ष पूज्य भंते धम्मबोधी; तसेच यावेळी कार्यक्रमासाठी माजी खासदार सुनीलराव गायकवाड, पोलीस निरीक्षक घुसनूर साहेब, माजी सरपंच साहेबराव जाधव , अजनी खुर्द चे माजी सरपंच, व ग्रामपंचायत सर्व सदस्य व. बौद्ध उपासक उपस्थित होते व डिजिटल मीडिया पत्रकार ,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.