logo

शिरसोली ग्रामपंचायतमध्ये २७.६९ लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आझाद समाज पार्टी'चा तीव्र आंदोलनाचा इशारा


जळगाव जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. ग्रामपंचायतीमध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सताधारी सदस्य आणि ग्रामसेवकांनी संगनमत करून सुमारे २७लाख ६९ हजार रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीच्या

सहा सदस्यांनी केला आहे. विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना निवेदन देऊन वा गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नायगाव धरणावरील सोलर आणि

विरोधी पंपाच्या ९ लाखांच्या

कामात तसेच शिक्षण, कौशल्य विकास आणि शिबिरांसाठी काढलेल्या १८ लाख ६९ हजार रुपयांमध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीशभाऊ

गायकवाड यांनी या प्रकरणाची तातडीने
चौकशी न झाल्यास आणि दोषी ग्रामसेवक व
सदस्यांवर कठोर कारवाई न झाल्यास, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणा बद्दल सतिश गायकवाड हे लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणबाल यांनी भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले या मोठ्या भ्राचाराच्या आरोपामुळे शिरसोली ग्रामपंचायतीमध्ये खळबळ उडाली असून, जिल्हा परिषदेच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

39
1430 views