logo

अभिनेते आर. जे. ऋषी शेलार यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त महिलांना माहेरची साडी भेट

प्रतिनिधी ३ ऑक्टोबर (धाराशिव) :- महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेते तसेच शिव शंभो प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अभिनेते आर. जे. ऋषी शेलार यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त महिलांना १००० माहेरची साडी भेट देण्यात आली. अलीकडेच धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातले होते. यामध्ये अनेक नागरिकांना पावसाचा आणि पुराचा फटका सहन करावा लागला. अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने आर्थिक नुकसान झाले होते. अशा परिस्थितीमध्ये आपला जीवनाचा गाडा पूर्वस्थितीवर आणणे शक्य नव्हते. अशा कठीण परिस्थितीमध्ये अभिनेते आर. जे. ऋषी शेलार यांनी मदतीचा हात पुढे केला. यामध्ये धाराशिव मधील पूरग्रस्त महिलांना माहेरची साडी वाटप करून आधार देण्याचे काम केले.

यावेळी अभिनेते आर. जे. ऋषी शेलार म्हणाले की आज तुमचा दसरा गोड केला आहे यानंतर येणारी दिवाळी सुद्धा नक्कीच गोड करणार आहे. याआधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस अभिनेते आर. जे. ऋषी शेलार यांनी मदत केलेली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस अशा प्रकारे मदत मिळाल्याने धाराशिव मधील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. महिलांना माहेरची साडी वाटप केल्यामुळे अभिनेते आर. जे. कृषी शेलार यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

19
1906 views