logo

दिघीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

दिघीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
पुणे: मुख्य संपादक उमेश पाटील 085306 64576
पिंपरी चिंचवड – दिघी येथील पंचशील बुद्ध विहारात भारतरत्न मित्र मंडळ व रमाई महिला मंडळ यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आयु. चंद्रकांतभाऊ वाळके यांच्या हस्ते धम्मध्वज फडकावण्यात आला. त्रिशरण पंचशील व वंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आयु. सुभाष भारती, आयु. पट्टेबहाद्दूर ताई, आयु. लता गायकवाड तसेच अध्यक्ष आयु. संजय वानखडे यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. समाधान कांबळे यांनी, प्रास्ताविक आयु. सुखदेव बागुल यांनी तर आभार आयु. सयाजीराव कांबळे यांनी मानले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सीएमई रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या चौकाला “मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर चौक” असे नाव देण्यात आले असून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच संयुक्त जयंती महोत्सव २०२५ च्या जमाखर्च अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचशील बुद्ध विहार उपासिका व भारतरत्न मित्र मंडळाचे सभासद यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी सर्वांना खीरदान करण्यात आले.


0
0 views