
खंडाळा तालुक्यातील कुमारी आसावरी वसावेचा निबंध स्पर्धेत यश
खंडाळा (जि. सातारा) –
पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, अहिरे (ता. खंडाळा) येथील विद्यार्थिनी कुमारी आसावरी आपसिंग वसावे हिने “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य” या विषयावर झालेल्या तालुका स्तरीय निबंध स्पर्धेत लहान गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा येत्या 7 नोव्हेंबर 2025 रोजी श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे होणाऱ्या “विद्यार्थी दिवस” कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, आसावरीची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली असून ती 8 ऑक्टोबर 2025 रोजी खंडाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
आसावरीच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती यादव मॅडम, सर्व शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांनी अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिच्या यशामागे वर्गशिक्षिका श्रीमती स्वप्नाली हेमकांत किरवे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
आसावरीचे वडील श्री. आपसिंग वसावे हे पळशी येथील रयत शिक्षण संस्थेत उपशिक्षक आहेत. त्यांच्या मुलीच्या यशाबद्दल परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
खंडाळा तालुक्यातून उगवलेले हे यश खरंच प्रेरणादायी ठरत आहे.