logo

वांगचुक यांना अटक न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात

नवी दिल्ली : पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (रासुका) अंतर्गत अटक केल्याच्या विरोधात, त्यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यांची त्वरित मुक्तता करावी,

वकील विवेक तनखा व वकील सर्वम ऋतम खरे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल झाली असून,

अशी मागणी केली आहे.

त्यात वांगचुक यांना 'रासुका'खाली अटक करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

सोनम वांगचुक यांना तत्काळ न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश लडाख प्रशासनाला देण्याची

मागणी गीतांजली जे आंगमो यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेत, गृह मंत्रालय, लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासन, लेहचे जिल्हाधिकारी आणि जोधपूर कारागृह अधीक्षक यांना पक्षकार करण्यात आले आहे.

10
382 views