logo

प्रमोद पवारांच्या आमरण उपोषणाला यश

*भिवंडी रस्त्यांसाठी प्रमोद पवारांच्या आमरण उपोषणाला यश: सर्व मागण्या मान्य, उद्यापासून काम सुरू!*

*भिवंडी, ४ ऑक्टोबर २०२५:* भिवंडी जनआंदोलन समितीचे प्रमुख प्रमोद पवार यांनी भिवंडी-पालघर रस्त्यांच्या दुर्दशेविरोधात पुकारलेल्या आमरण उपोषणाने चौथ्या दिवशी रात्री ऐतिहासिक यश मिळवले आहे. सर्व मागण्या मान्य झाल्या असून, रस्त्याचे काम दर्जेदार आणि तातडीने करण्याबाबत आणि लोकाना खड्ड्यांपासून लवकरच दिलास मिळावा ही मागणी नियोजनबद्ध पद्धतीने मान्य करण्यात आली. बांधकाम मंत्र्यांनी भ्रष्ट ठेकेदार कंपनी जिजाऊ कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट करण्याची लेखी हमी दिली आहे. तसेच, या कंपनीला यापुढे रस्त्यांचे कोणतेही काम देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा आणि भाजप प्रदेश सरचिटणीस अशोक शेळके यांनी बांधकाम मंत्र्यांच्या वतीने पुढाकार घेऊन सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढला, ज्यामुळे उपोषण यशस्वीपणे संपले. या विजयामुळे भिवंडी-पालघर परिसरातील जनतेत समाधानाची लहर पसरली असून, प्रमोद पवार आणि त्यांच्या तरुण सहकाऱ्यांचे भिवंडी जनआंदोलन समितीच्या सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

उपोषणाची पार्श्वभूमी अशी होती की, भिवंडी-पालघर रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत प्रमोद पवार यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी जनआंदोलन समितीने उपोषणाची हाक दिली. तरुण कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला जोरदार पाठबळ दिले, ज्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला. चौथ्या दिवशी बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य झाल्या. यामुळे उपोषण संपले आणि रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

*मागण्यांवर काय ठरले?*
कामाचा कृती आराखडा: भिवंडी-पालघर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार, उद्यापासून (५ ऑक्टोबर २०२५) विविध ठिकाणी कामांना सुरुवात होणार आहे. अनगाव येथे स्टेबिलायझेशनचे काम सुरू झाले असून, ८१/५०० मध्ये JSB आणि पॅचिंगचे काम त्वरित पूर्ण केले जाईल. वारेट येथील पॅचिंग वर्क उद्याच सुरू केले जाईल, तर अंबाडी ते शेलार दरम्यान एक लेन फेब्रुवारी २०२६ पर्यंत तयार होईल. दुंगड फाटा ते कवाड आणि कवाड ते शेलार येथे उद्यापासून काम सुरू होईल, ज्यामध्ये JE उपस्थित राहतील आणि कामाच्या स्वरूपाचे फ्लेक्स लावले जातील. ईगल कंपनीने वाडा ते डाकिवली दरम्यान ८ किमी सिंगल लेनचे काम पूर्ण केले असून, उद्यापासून वारेट, महापोली, आणगाव आणि कवाड येथे नवीन कामे सुरू होतील. डाकिवली, मुसरणे, शिरीषपाडा आणि खुपरी येथे कामे सातत्याने सुरू असून, डाकिवली ते मनोर दरम्यान चार टीम्स उद्यापासून कार्यरत राहतील. याशिवाय, कामाच्या गुणवत्तेसाठी प्रायव्हेट आणि सरकारी लॅबमध्ये सॅम्पल टेस्टिंग लाइव्ह होईल आणि कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी त्वरित नेमली जाईल.

*भ्रष्टाचारावर कारवाई:* जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची बांधकाम मंत्र्यांची लेखी हमी. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन कारवाई करण्याचे आणि लेखी पत्र सादर करण्याचे आदेश.

*ईगल कंपनीला अतिरिक्त निधी:* ८०३ कोटींचे टेंडर घेणाऱ्या ईगल कंपनीने पैसे नसल्याने काम सुरू नसल्याची ओरड केली होती ती सपशेल खोटी होती हे भिवंडी जन आंदोलन समितीच्या सुनील लोणे यांनी आज जाहीर केले. या कंपनीला १०० कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्यात आल्याचे आंदोलकांनी यावेळी पुराव्यानीशी जाहीर केले. याबाबत चौकशी करून सबंधित दोषींवर कारवाई केली जाईल असेही बांधकाम मंत्र्यांनी आश्वासित केले.


*श्वेत पत्रिका:* रस्त्यांच्या रखरखावातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनावर श्वेत पत्रिका बाबत बांधकाम विभागाचा प्रस्ताव येताच चौकशी करून त्वरित प्रसिद्ध केली जाईल.

*सॅम्पल टेस्टिंग:* कामाच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी प्रायव्हेट आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये सॅम्पल टेस्टिंग लाइव्ह होईल.


*कामाचे नियंत्रण:* रस्त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी त्वरित स्थापन होईल. तसेच, भिवंडी ते वाडा मार्गावर कामाच्या स्वरूपाचे फ्लेक्स आज (५ ऑक्टोबर) लावले जातील.


*जनतेचा विजय आणि भविष्यातील आशा*
या यशस्वी उपोषणामुळे भिवंडी-पालघर रस्त्यांची वाहतूक लवकरच सुधारेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी मध्यस्थी करत जनहिताला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. भिवंडी जनआंदोलन समितीने या विजयाला “साकारात्मक आणि ऐतिहासिक” असे संबोधले आहे. प्रमोद पवार यांच्या धैर्यपूर्ण नेतृत्वाने आणि तरुण सहकाऱ्यांच्या मेहनतीने स्थानिक राजकारणात नवे वळण आले आहे. भिवंडीकरांनी या विजयाचे स्वागत केले असून, ते म्हणतात, “प्रमोद पवार यांच्यासारखे नेते असतील तर बदल नक्कीच शक्य आहे!” या आंदोलनाने भविष्यात अशा जनआंदोलनांना प्रोत्साहन मिळेल, अशी आशा आहे.
सुनील लोणे यांच्यासारखे अनुभवी आंदोलक तसेच कल्पेश जाधव, ॲड. असगर पटेल, रूपेश जाधव ॲड सोनाली पवार, डॉ.वर्षा पाटील, प्रीती पाटील, ,मिलिंद कांबळे, भूषण घोडविंदे, नवनाथ भोये, मुकेश जोशी, मुकेश पाटील, निलेश चव्हाण, महेश ठाकरे, सुशांत चौधरी, राज ठाकरे,भूषण जाधव, सतीश जाधव सागर न्हाणवे, सचिन जाधव, स्वप्नील जाधव,जगदीश पाटील, यांसारखे शेकडो तरुण या आंदोलनात सक्रियपणे उतरले आहेत.

या तरुण हरहुन्नरी आंदोलकांना कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील , काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, शिवसेना (शिंदे गट) सुनील पाटील, ज्येष्ठ काँग्रेस नेते केशव लाटे, माजी सभापती शांताराम पाटील, संपर्क प्रमुख दशरथ पाटील(गुरुजी) ,शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख निलेश पाटील, युवा सेना प्रमुख सचिन पाटील, स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितेश (बंटी) पाटील, पीपल्स रिपब्लिकन जिल्हा अध्यक्ष स्वप्नील जाधव, मनसे उपजिल्हा प्रमुख मदन पाटील, तालुका प्रमुख विकास जाधव, शिवसेना उपतालुका प्रमुख किशोर जाधव, कृती समिती अंबाडी विभाग, जिल्हापरिषद सदस्य कैलास देवा, दयानंद पाटील, राजेश मुकणे, किशोर जाधव, शिवसेना (ठाकरे गट) भिवंडी तालुका माजी सभापती रवीना जाधव, वाडा तालुका पंचायत समिती माजी सदस्य संचिता भगत, तालुका प्रमुख प्रसाद पाटील, काँग्रेस तालुका प्रमुख सचिन पाटील, मुस्लिम तेली समाज युवा उत्कर्ष संस्थेचे मलंग शेख,देवा ग्रुप फाउंडेशन तर्फे सचिव तानाजी मोरे, ज्ञानेश्वर पवार ,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ विजय गायकवाड, महाराष्ट्र बेलदार समाज अध्यक्ष विनोद मोहिते, लेखक हृषिकेश सावंत,ॲड अनिश सांबरे, वकील संघटनेचे अध्यक्ष तसेच रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस ॲड. किरण चन्ने, ॲड. प्रदीप मते ,ॲड. राठोड , ॲड. निहेश गायकवाड, ॲड. दिनेश जाधव, ॲड.श्री व सौ राजेश उबाळे,डॉ. विनय पाटील, डॉ.समीर किस्मतराव,डॉ. प्रश्नात पाटील, डॉ दत्ता सदगीर, डॉ. विशाखा पवार,मधुकर पाटील, भोईर ह्यूमन राईट्स फाउंडेशन ,अमित शिर्के, तसेच उलगुलान ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक शिंगाडा, सचिव संतोष सोनवणे, विवेक पवार, प्रकाश पवार, एकनाथ लकडे,सूत्रसंचालक सूरज पाटील,आर्यन फाउंडेशन, तेली समाज फाउंडेश, के एच ग्रुप, आर्यन आदिवासी ग्रुप यांसह अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे अध्यक्ष बळीराम शिंदे, असंख्य कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि महिला मंडळ, वारकरी संप्रदाय मंडळ , ग्रामपंचायत गणेशपुरी, अंबाडी, लाप, ग्रामविकास मंडळ महाळुंगे , अंबाडी येथील सर्व व्यापारी संघटना, इलेक्ट्रॉनिक व्यापारी युनियन अंबाडी नाका, स्नेहांकुर कुणबी सामाजिक सेवा संस्था, सुवर्णकार संघटना, तानसा सीएनजी स्टेशन, शेट्टी अपार्टमेंट, भारत नैसर्गिक शेती शेतकरी गट, प्रवासी वाहन चालक, भाजी विक्रेते संघ यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दिला.

117
7181 views