logo

“श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखालील आंदोलन यशस्वी – कामगारांना हक्क मिळणार”

पुणे, हिंजवडी : सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५
बीव्हीजी (BVG) कंपनीकडून वाडीबंदर रेल्वे कॉन्ट्रॅक्ट कामगारांचे हक्काचे थकबाकी वेतन, दर दोन महिन्यांची वेतनवाढ, सणसुट्टी रजा, राष्ट्रीय सुट्ट्यांचे पैसे तसेच इतर कायदेशीर लाभ गेल्या काही वर्षांपासून देण्यात आले नव्हते. याबाबत वारंवार निवेदन करूनही कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नव्हती. यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.
या अन्यायाविरोधात श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना व सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघाच्या वतीने पुणे हिंजवडी येथील बीव्हीजी कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर रोजी मोठे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कामगारांच्या सर्व मागण्या ठाम व संघटित पद्धतीने कंपनीसमोर मांडण्यात आल्या.
कामगारांचा दबाव वाढताच अखेर कंपनी व्यवस्थापनाने सर्व मागण्या मान्य करत, एक महिन्याच्या आत सर्व थकबाकी पूर्ण करण्याचे लिखित आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी ठरले असून, कामगारांच्या न्यायासाठी लढणाऱ्या श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेची ताकद अधोरेखित झाली आहे.
हे यशस्वी आंदोलन श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण व सचिव अमितजी भटनागर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली घेण्यात आले . तसेच या आंदोलनाला श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा व सेन्ट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघाच्या कामगारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या आंदोलनामध्ये प्रामुख्याने श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे संघटक प्रमुख नाना बच्चाव, सोशल मीडिया प्रमुख प्रकाश चव्हाण, मराठवाडा अध्यक्ष बापू भुसारे, पिंपरी चिंचवड युवा सेना अध्यक्ष माऊली जगताप तसेच सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघाचे CRCLS वर्किंग कमिटी वाडीबंदर डेपो येथील सचिन नगरे ,संजय दाभाडे, हिरामण भांगरे
सुहास जाधव ,सुदेश माने ,रमेश पवार, जयदेव गोडे
किरण जाधव ,कैलास साळवी ,समीर देवळेकर ,
गोविंदराज अरुणदुदियार ,गणेश वांडरे ,सागर जोशी , विष्णू वाघ,सुमित बारगुडे, सेंटर रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघाचे सर्व कार्यकारी सदस्य यांच्यासह शेकडो कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांच्या संघटित लढ्यामुळे कंपनीला मागण्या मान्य कराव्या लागल्या हा विजय कामगारांच्या ऐक्याचे प्रतिक ठरला आहे.

34
6834 views