
विरदेल येथील शेतकरी श्री.गंभीर नधनगर यांच्या शेतात नाथ बायो जीन्स राणा ९०० या कंपनीचा पिक पाहणी कार्यक्रम पीक पाणी प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न.
(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
विरदेल ता. शिंदखेडा येथील प्रगतशील शेतकरी श्री गंभीर निंबा धनगर यांच्या शेतात (श्री नवनाथ धाम मंदिर विरदेल) येथे नाथ बायो जीन्स या कंपनीचे राणा 900 या कापूस वाणाची पीक प्रात्यक्षिक पाहणी झाली.विरदेल गावातील व पंचक्रोशीतील परिसरातील सर्व प्रगतशील शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते. प्रगतशील शेतकरी श्री गंभीर निंबा धनगर यांना कंपनीकडून शाल श्रीफळ नारळ व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमास आलेल्या सर्व प्रगतशील शेतकरी बांधव श्री सुदाम पाटील, श्री देविदास बेहेरे , श्री गिरीश बिराडे, श्री सतीश बेहरे, श्री प्रेमराज पाटील श्री हेमंत गिरासे, श्री राकेश बेहरे, श्री दीपक बेहेरे, श्री नामदेव कुंभार, श्री अशोक गुरव श्री जितेंद्र पेंढारकर,श्री योगराज माळी श्री समाधान कोळी श्री कपिल पाटील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच कार्यक्रमातील मान्यवर शेतकऱ्यांच्या कंपनीतर्फे व साई समर्थ ॲग्रो एजन्सी विरदेल चे संचालक श्री सागर बच्छाव यांच्यातर्फे सत्कार समारंभ करण्यात आला .कंपनीचे अधिकारी श्री विनोद अहिरे साहेब श्री पुंडलिक भामरे साहेब , श्री ललित माळी साहेब,यांनी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांना कापूस वाण राणा 900 याबद्दल झाडांची बोडांची संख्या, वाणाचे रोग प्रतिकारक क्षमता, फुलपात्यांची संख्या, तसेच बोंडांची साईज व राणा 900 .वाणाबद्दल पिकाचे लागवडीविषयी नियोजन, बियाण्याची निवड, लागवडीचे अंतर, रासायनिक खतांचे नियोजन, कीटकनाशकाचे फवारणी याबद्दल माहिती दिली, तसेंच
कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी इतर विषयांवर सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमास आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या साई समर्थ ॲग्रो एजन्सी(श्री सागर बच्छाव) यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आला