logo

मुंबई गोवा महामार्गावर ओणी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यु

प्रतिनिधी - अनिकेत मेस्त्री

मुंबई गोवा महामार्गावर तालुक्यातील ओणी नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे . याबाबतची माहीती राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अमित यादव यानी राजापूर वनविभागाला दिली असल्याची माहिती राजापूर विनविभागाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे .
याबबत राजापूर वनविभागाने दिलेल्या माहितीनुसरा शनिवार दिनांक 4/10/ 2025 रोजी मौजे ओणी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील लांजा ते राजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या रस्त्यावर बिबट हा वन्यप्राणी मृत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती सकाळी 3:४० वाजण्याच्या सुमारास श्री. अमित यादव पोलिस निरीक्षक राजापूर यांनी दूरध्वनी वरून वनविभागाला दिली . त्याप्रमाणे राजापूर वनविभागाने तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना सदरची माहिती देऊन सर्व स्टाफसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तर लांजा ते राजापूर जाणाऱ्या महामार्गाच्या उजव्या बाजूला वन्यप्राणी बिबट (नर) निपचित पडलेला दिसून आला जवळ जाऊन बिबट्याची पाहणी केली असता अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या तोंडाला व डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने नोंदवला आहे .
त्यानंतर पशुधन विकास अधिकारी राजापूर वैभव चोपडे यांनी सदर बिबट्याचे शवविच्छेदन केले असुन सदर बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे 3 ते 4 वर्षांचा असल्याची माहितीही वनविभागाने दिली आहे . सदर घटनेचा गुन्हा नोंद केला. असून कागदपत्र तयार करून पुढील तपास चालू करण्यात आला आहे .
सदरची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कार्यवाहीसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी जयराम बावधने वनपाल राजापूर विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर , नीलेश म्हादये यांनी कार्यवाही पूर्ण केली.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी गिरिजा देसाई यांनी केले आहे.

171
3743 views