रमेश कंतेवार व वैजनाथ स्वामी यांची राज्य सल्लागार कार्यकारणी मध्ये निवड
मुंबईःराष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेच्या राज्य कार्यकारिणी मध्ये माजी पोलीस उपधीक्षक तथा पत्रकार रमेश कंतेवार व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार वैजनाथ स्वामी यांची महाराष्ट्र राज्य सल्लागार कार्यकारणी मध्ये नियुक्ती करण्यात आली .राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटना देशात व परदेशात 24 देशात कार्य करीत आहे .रमेश कंतेवार व वैजनाथ स्वामी यांची नियुक्ती करण्याचे आदेश "महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप भालेराव " यांनी राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटते च्या कोअर कमिटीला दिले .राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटना जनहितासाठी निस्वार्थ काम करत आहे .