logo

प्रविण निमोदिया महावीर इंटरनॅशनल विदर्भ झोनचे प्रेसिडेंट नियुक्त



यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे की प्रतिष्ठित महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या विदर्भ झोन प्रेसिडेंट पदावर समाजसेवक प्रविण रमेशचंद्र निमोदिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महावीर इंटरनॅशनल संस्था संपूर्ण देशभर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण या क्षेत्रात अनेक सेवा कार्ये करीत आली आहे. या कार्यांना नवी दिशा देणे, विविध केंद्रांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे व विदर्भ क्षेत्रात नवे उपक्रम राबविण्याची जबाबदारी आता प्रविण निमोदिया यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली जाणार आहे.

या नियुक्तीचे श्रेय इंटरनॅशनल प्रेसिडेंट सी.ए. अनिल जैन, सेक्रेटरी सोहनजी वेध, रिजन ९ चे वाइस प्रेसिडेंट दिलीपजी भंडारी तसेच महावीर इंटरनॅशनल यवतमाळ सेंटर येथील सर्व पदाधिकारी व सदस्यगण यांच्या मार्गदर्शन व सहकार्याला दिले जाते, ज्यांच्या प्रेरणेमुळे ही उपलब्धी शक्य झाली आहे.

निमोदिया यांच्या या नियुक्तीमुळे विदर्भ क्षेत्रातील समाजोपयोगी उपक्रमांना नवी ऊर्जा व गती मिळेल तसेच संस्थेची प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

1
34 views