होला पक्षाची शिकार; तिघांना अटक
कराड, दि. 5 :
बामणोली वनपरिक्षेत्रातील वन्यजीव सप्ताह जनजागृती कार्यक्रम आटोपून परतत असताना वन विभागाच्या पथकाने मौजे म्हावशी परिसरात ठीपकेवाला होला (Spotted Dove) पक्षाची शिकार करणाऱ्या तिघांना रंगेहात पकडले.
अटक केलेल्या आरोपींची नावे –
1. नितीन खरात
2. बाबू लावुड
3. राजू लावुड (सर्व राहणार पुसेगाव)
वन विभागाने आरोपींकडून मृत पक्षी, Vertigo गन आणि 3 मोबाईल जप्त केले. या कारवाईत उपसंचालक व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.
सदर क्षेत्र प्रादेशिक विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने तिघाही आरोपींना पुढील कारवाईसाठी वनपरिक्षेत्र मेढा (T) कार्यालयाच्या ताब्यात सुपूर्त करण्यात आले आहे.