logo

अजमेरा कन्स्ट्रक्शन कंपनीमुळे ग्रामपंचायत पाणीपुरवठा रस्ता व शेतरस्त्याचे नुकसान झाले आहे या बाबत......

📰 स्थानिक बातमी

मेंढा परिसरात अजमेरा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरु असलेल्या कामामुळे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा रस्ता तसेच शेतरस्त्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. रस्त्यावर मुरूम वाहून नेहला असून खडे व माती रस्त्यावर पडल्याने शेतकऱ्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे कठीण झाले असून काही ठिकाणी रस्ता खचल्याचीही तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायतीने व मसूल खात्याने या संदर्भात कंपनीकडून झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून तातडीने दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

117
9187 views