logo

गंगापूर नगर परिषदेची आरक्षण प्रभाग निहाय सोडत लहान मुलांच्या हस्ते चिट्ठ्या काढून जाहीर

गंगापूर नगरपरिषदेची निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या सोडतीची प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक आणि शासकीय नियमांनुसार करण्यात आली. विशेष म्हणजे,आरक्षण साठी लॉटरीच्या चिठ्ठ्या दोन लहान मुलांनी चिठ्ठ्या काढून प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.नगरपरिषदेच्या नव्या आरक्षणानुसार, गंगापूर नगरपरिषदेत १ नगराध्यक्ष, १० महिला नगरसेविका आणि १० पुरुष नगरसेवक असा एकूण २१ सदस्यांचा समावेश आहे.

"प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे:
१) ओबीसी महिला, ओपन
२) ओपन महिला, ओपन पुरुष
३)ओबीसी महिला, ओपन पुरुष
४)एस.सी.पुरुष, ओपन महिला
५)एस.सी. महिला, ओपन पुरुष
६)ओपन महिला, ओपन पुरुष
७) ओबीसी पुरुष,ओपन महिला
८)ओबीसीमहिला, ओपन पुरुष
९)ओपन पुरुष, ओपन महिला
१०)ओबीसी पुरुष,ओपन महिला सोडत प्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे,निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे, तसेच अनेक नागरिक,राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

17
1252 views