logo

अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचा ‘ग्लोबल व्हिजनरी अवॉर्ड’; रायगडच्या सात जणांचा सन्मान

*"विकसित भारत व्हिजन २०४७" ला समर्पित कार्यक्रम "ग्लोबल व्हिजनरी अवार्ड २०२५" अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या तर्फे करनाल - हरीयाणा येथे दि. ०५/१०/२०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला होता. यासाठी विशेष पाहुणे म्हणून श्री. धनंजय प्र. म्हात्रे - नॅशनल चिफ सेक्रेटरी यांना आमंत्रित करण्यात आले होते.*

*त्यामध्ये अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया च्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीच्या व सामाजिक उल्लेखनीय कामगिरी बद्दल अलिबाग तालुक्यातील सात जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. १) सौ. धनश्री धनंजय म्हात्रे - स्टेट चेअर परसन महाराष्ट्र, २) सौ. प्रिया कर्णिक - डिस्ट्रिक्ट चेअर परसन रायगड, ३) सौ. श्रद्धा वैद्य - डिस्ट्रिक्ट लिगल एडव्हाजर रायगड, ४) श्री. नरपतसिंग राजपुरोहित - स्टेट चिफ एडव्हाजर महाराष्ट्र, ५) सौ. उज्ज्वला चंदनशिव - स्टेट चिफ डायरेक्टर महाराष्ट्र, ६) श्री. मिलिंद मगर - तालुका जनरल सेक्रेटरी अलिबाग, ७) सौ. नेहा गायकवाड - तालुका चिफ डायरेक्टर अलिबाग या सर्वांना सन्मानित करण्यात आले.*

*या सोहळ्यासाठी अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया चे सुप्रिमो व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नरेंद्र अरोराजी, सुप्रसिद्ध सिने अभिनेता शाबाज खान आणि सिनेअभिनेत्री पद्ममिनी कोल्हापूरी तसेच विविध उद्योजक, व संपूर्ण भारतातून आलेले मान्यवर उपस्थित होते.*

*श्री. धनंजय म्हात्रे - नॅशनल चिफ सेक्रेटरी हे संपूर्ण भारतामध्ये मागिल आठ वर्षे सातत्याने फाउंडेशनचे कार्य पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत त्याची दखल घेऊन त्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करून सन्मानित करण्यात आले.*

35
1577 views