logo

भाजी पाला, सखस आहार घ्या व जीवन रोग मुक्त करा. सीडीपीओ. सुप्रिया जेडगे.

शमणेवाडी - सध्याच्या या काळात एकंदरीत बाहेरच्या खाण्याला सर्वजण अधिक महत्व देत आहते पण हे आपल्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे. या जंक आहाराचा परिणाम आपल्या शरीरावर होत असून, लोक अनेक आजाराला बळी पडत आहेत. तर आपण आपल्या मुलांच्या साठी सखस व सत्व युक्त आहार दिला तरच मुलांची वाढ उत्तम प्रकारे होईल, तेंव्हा सखस आहार व भाजी पाला. फळे खा व आरोग्य वंत व्हा,असे आवाहन निपाणी विभागाच्या महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकारी सुप्रिया जेडगे यांनी केले.
जिल्हा पंचायत बेळगांव, व महिला व शिशू अभ्रुद्धी योजना बेडकिहाळ, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बेडकिहाळ कक्षेत येणाऱ्या बेडकिहाळ, शमनेवाडी, चांद शिरदवाड व नेज येथील अंगणवाडी शिक्षिकां यांच्या वतीने व शमनेवाडी ग्राम पंचायत यांच्या सहकार्याने पिकेपीएस शमनेवाडी च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या "पोषण मास" व 'घरोघरी पोषण हब्बा' या कार्यक्रमा प्रसंगी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
अंगणवाडी शिक्षिकांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली,शमनेवाडी ग्राम पंचायत उपाध्यक्षा कल्पना तारदाळे, बेडकिहाळ ग्राम पंचायत अध्यक्ष शिवानंद बीजले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यधिकारी प्रज्ञा बडीगेर, ग्राम विकास अधिकारी नागराज शिंदे,प्रकाश धनगर यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमा प्रसंगी पुष्पा कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केल्या.
या प्रसंगी सर्व अंगणवाडी केंद्रांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी अंगणवाडी केंद्रांच्या मुलांचा सामूहिक वाढ दिवस, बाळाला प्रथम अन्नप्राशन, अक्षर संस्कार, गर्भवती महिलांची ओठी भरणी, याच बरोबर सखस आहार व प्रदर्शन असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी ग्राम विकास अधिकारी नागराज शिंदे,आण्णासाहेब भेंडवाडे, शिवानंद बीजले, सहाय्यक सिडीपिओ जयश्री कौजलगी, जी डी पाटील, आरोग्य अधिकारी प्रज्ञा बिडीगेर यांनी मनोगत व्यक्त करून पौष्टिक आहाराचे महत्व सांगितले.
या कार्यकेमा प्रसंगी परीवेक्षिका सुशीला हरके आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडीच्या शिक्षिका, महिला व ग्राम पंचायत सदस्य , सदस्या उपस्थित होते. आभार अंगणवाडी शिक्षिका ललिता नलवडे यांनी मानले

3
260 views