
मानसिक आरोग्य ही आजची गरज — डॉ. अनिल बत्रा
*श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा*
यवतमाळ:-दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे मानसिक आरोग्याचे महत्त्व जनमानसात पोहोचवणे व मानसिक आरोग्य सेवांबद्दल जागरूकता वाढविणे हे आहे.
या वर्षीचा विषय मानसिक आरोग्याविषयी जागरूकता, समज आणि सहानुभूती वाढविण्यावर आधारित असून, याच अनुषंगाने श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथील मनोविकार विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.
या निमित्ताने आठवडाभर विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. रेडिओ चर्चासत्रांद्वारे उदासीनता (Depression), ओसीडी (OCD), आत्महत्येची प्रतिबंधक उपाययोजना, मानसिक आरोग्याचे महत्त्व, सिझोफ्रेनिया (Schizophrenia) आणि डोकेदुखी यांसारख्या विषयांवर जनजागृती करण्यात आली.
तसेच एमबीबीएस आणि नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी पोस्टर सादरीकरण व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. याशिवाय “तणाव व्यवस्थापन” (Stress Management) या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी व कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन मनोविकार विभागाचे प्रमुख डॉ. श्रीकांत मेश्राम यांच्या पुढाकाराने तसेच महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.
या प्रसंगी बोलताना डॉ. अनिल बत्रा म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक आणि तणावग्रस्त जीवनशैलीत मानसिक आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज बनली आहे. मानसिक आरोग्य राखणे हे शारीरिक आरोग्याइतकेच आवश्यक आहे असे मानलेत. या वेळी अनिता राठोड प्राचार्या, परिचारिका महाविद्यालय,वंदना सयाम विभागीय परिचारिका,माया मोरे अधी परिचारिका, विद्यार्थी , आदी उपस्थित होते.