logo

हफीज बेग उर्दू हायस्कूल व ज्युनिअर* *कॉलेजचे मुख्याध्यापक व प्राचार्य सन्मानित

यवतमाळ:- आदर्श राष्ट्र निर्मितीसाठी महात्माजींनी सत्य, अहिंसा व प्रेमाच्या आधारे स्वतंत्र भारताची उभारणी करत भारतीय माणसाच्या मनात भयमुक्तीचा विचार रुजविला ज्ञान , ध्यान , पुजा, विवेक , आनंद याला अध्यात्माची जोड देत अखिल मानवी कल्याणचा मूलमंत्र बापूंनी संपूर्ण जगाला दिला.
तसेच सय्यद जफरुज्जमा सय्यद जकरिया, प्राचार्य, हफीज बॅग उर्दू जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स आर्णी व सलीम जावेद शेख युनुस , मुख्याध्यापक, हफीज बेग उर्दू हायस्कूल आर्णी या दोघांना " एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र " यांनी आपल्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी " महात्मा गांधी सेवा गौरव पुरस्कार २०२५ " ने सन्मानित केले. हे दोघेही शिक्षक , कवी व समाजात शैक्षणिक कामासाठी ओळखले जातात. युट्युब , व्हाट्सअप ,फेसबुक, तसेच ऑनलाइन , ऑफलाइन कवी संमेलन मध्ये सूत्र संचालना ची जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा उर्दू भाषेच्या विकासासाठी कार्य करतात.
सय्यद जफरुज्जमा सय्यद जकरिया प्रचार्य म्हणून कार्य करत असताना " जफर शाद कलगांवी " या नावाने यांच्या " गझल संग्रह " तीन पुस्तकात सामील आहे पहिला " यादों का सफर" दुसरा " यादों के चराग " तिसरा " यादों के दरीचे " तसेच " खुशबू ए खैरूल बशर " ही पुस्तक प्रेषित मोहम्मद पैगंबर वर आधारित शायरीची आहे. ज्याच्यात १५० नात शरीफ असून प्रकाशनाचे काम बाकी आहे. तसेच शैक्षणिक व सामाजिक कार्यात इयत्ता पहिली ते बारावी व बी. ए. , एम. ए., डी. एड., बी.एड., तसेच इतर कोर्सेस मध्ये विद्यार्थ्यांना फोन लावून व घरी जाऊन त्यांची कौन्सिलिंग व प्रवेश करतात. सन २०१२ ते २०२० पर्यंत विनावेतन काम करताना सुद्धा ही सर्व कामे या दोघांनी पार पाडली म्हणून यांना या संस्थेद्वारे सन्मानित करण्यात आले.

24
293 views