logo

"वरकुटे-म्हसवड गण आरक्षण महिला प्रवर्गात; योगिता घुटुकडे यांच्या नावाच्या चर्चेला उधाण!"

"वरकुटे-म्हसवड गण आरक्षण महिला प्रवर्गात; योगिता घुटुकडे यांच्या नावाच्या चर्चेला उधाण!"

आज जाहीर झालेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या आरक्षणात मार्डी गटातील वरकुटे-म्हसवड गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गासाठी राखीव ठरला आहे.

या पार्श्वभूमीवर हिंगणीचे युवा उद्योजक डॉ. आप्पासाहेब घुटुकडे यांच्या नावाची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, डॉ. घुटुकडे यांच्या सौभाग्यवती योगिता घुटुकडे या देखील वरकुटे-म्हसवड गणातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे.

राजकीय समीकरणे आणि स्थानिक जनतेचा पाठिंबा लक्षात घेता या गणातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

9
590 views