आठवडाभराच्या विश्रांती नंतर वरुण राजाचें जोरदार पुनरागमन
येरे येरे पावसा...तुला देतो पैसा हे बालगीत पूर्वी लहानग्यांना नादी लावण्यासाठी म्हटले जायचे.परंतु गेल्या काही वर्षांपासून माणसांवर पावसाला साकडे घालण्यासाठी ही विनवणी करायची वेळ आली आहे, आपल्या कर्माची फळे आपणच भोगत आहोत.बेसुमार वृक्षतोड आणि झपाट्याने वाढत असलेली शहरे यांचा दुष्परिणाम आपल्या जीवनावर होत आहे. असे असले तरी ह्या वर्षी वरुण राजाची कृपा जरा जास्तच झाली आणि एक महिना उशिराने होणारे आगमन एक महिना अगोदर झाले.इतके नसे थोडके म्हणून संपूर्ण मोसमात आपली हजेरी लावलेल्या पावसाने नवरात्री नंतर थोडी विश्रांती घेतल्याने अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे माणसांची दमछाक होत असतांनाच दिनांक २५ आणि २६ ऑक्टोबरला परत जोरदार पुनरागमन केले त्यामुळे गुंडाळून ठेवलेले रेनकोट, छत्र्या घराच्या कोपऱ्यात विश्रांती घेत असताना आम्ही मात्र ओलेचिंब भिजून आई बाबांचे,बायकोचे ओरडणे ऐकत चूपचाप बाथरूम मध्ये घुसलो, सुकलेल्या कपड्यांच्या शोधात ... देवापुढे माणूस पालापाचोळा रे... हे गाणे मनात पुटपुटत.