logo

महाळुंग बाह्य वळणावर अपघात दुचाकी स्वार ठार मुलगी जखमी . अकलूज पोलीस ठाण्यात कारचालका विरुद्ध गुन्हा दाखल .

महाळुंग परिसरात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे हा अपघात रविवारी 26 सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडला याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघाताची माहिती मृताचा भाऊ लखन रणदिवे (वय .34 रा. वेळापूर) यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार संबंधित गाडी चालक अभिजीत प्रमोद पाठक(रा. कोंढवा पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण अंबादास रणदिवे(वय.३५.रा वेळापूर) हे कामानिमित्त बाहेरगावी चालले होते त्यावेळी त्यांच्या मोटरसायकलला (क्रमांक एम एच 16/बी. क्यू २६८०) पंढरपूर ते इंदापूर महाळुंग बायपास पालखी मार्गावर सकाळी 11 वाजता एका कारने(क्रमांक एम 12.पीएन.६८२०) जोरदार धडक दिली या धडकेत लक्ष्मण गंभीर जखमी झाला त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या मोटरसायकलवर त्यांची मुलगी वैष्णवी रणदिवे ((वय११) मी गंभीर जखमी झाले आहे तिच्यावरून उपचार सुरू आहेत

30
545 views