डोनगांव/प्रतिनिधि/सद्दाम खान
डोणगाव सर्कल पंचायत समिती निवडणूक : अपक्ष उमेदवार मुशीर खान मुनीर खान यांना मौलाना अजीम मिफ्ताही यांचे समर्थन
डोणगाव / प्रतिनिधी :
डोणगाव सर्कल पंचायत समिती निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मुशीर खान मुनीर खान यांना मौलाना अजीम मिफ्ताही यांचे समर्थन जाहीर झाले आहे.
मौलाना अजीम मिफ्ताही यांनी सांगितले की, “मुशीर खान हे समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन विकासाच्या दिशेने काम करणारे प्रामाणिक आणि मेहनती व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या विजयानंतर डोणगाव परिसरात खऱ्या अर्थाने विकास घडेल,” असे ते म्हणाले.
या समर्थनानंतर परिसरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून मतदारांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. मुशीर खान यांच्या प्रचाराला आता नवा उत्साह लाभला असून स्थानिक पातळीवर त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.