logo

हॉटेल सातबारा जवळ मोटरसायकलचा अपघात दोन जागीच ठार AIMA NEWS BULDHANA ASIF SHAIKH

हॉटेल सातबारा जवळ मोटरसायकलचा अपघात दोन जागीच ठार



दुसरबीड दि. 31 मलकापूर पांगरा ते दुसरबीड रोडवर वरील हॉटेल सातबारा जवळ मोटरसायकलचा अपघात होऊन दोन ठार झाल्याची घटना आज सायंकाळी आठ वाजे दरम्यान घडली.

साखरखेर्डा येथील शेख आरिफ शेख कादर वय 35 वर्ष वार्ड क्रमांक चार राहणार साखरखेर्डा शेख अल्ताफ शेख अक्रम वय 22 वर्ष वार्ड क्रमांक चार राहणार साखरखेडा हे दोघे आपले मोटरसायकल क्रमांक mh28 बीजे 40 29 ने साखरखेर्डावरून दुसर बीड येथे रिसेप्शन कार्यक्रमासाठी जात असताना दुसर बीड येथील हॉटेल सातबारा समोर रिंग रोडचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात रिंग रोडला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

हॉटेल सातबारा समोर समृद्धी महामार्गाच्या इंटर चेंज साठी रिंग रोड बनवण्यात आलेला असून तेथे कोणतंच फलक दर्शवणारा नसल्याने व त्यांना रिंग

MH.28.BJ

4029

रोडचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचे बोलल्या जात आहे तर कोणी अज्ञात वाहनाने धडक दिल्याचेही चर्चा सुरू होती सदर दोन्ही व्यक्ती साखरखेर्डा येथील एकाच वार्डातील रहिवाशी असून घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा येथील वाड क्रमांक चार मध्ये शोककळा पसरली होती सदर दोन्ही व्यक्तींना किनगाव राजा पोलिसांनी पीएम साठी सिनखेडराजा येथे रवाना केले आहे वृत्तलेपर्यंत कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.



30
1161 views