logo

विरदेल गावासाठी माझं गाव –सुंदर गाव संकल्पनेतून घनकचरा गाडी मंजूर..

(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

महाराष्ट्र राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आज दोंडाईचा येथे ३० गावांना गावातील घनकचरा संकलन करण्यासाठी घंटा गाडी लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.. आपल्या विरदेल गावासाठी माझं गाव– सुंदर गाव– अशी संकल्पना बाळगून घनकचरा गाडी मंजूर करण्यात आली व गावात ती गाडी फिरताना पण दिसून आली..गावातील नागरिकांनी व महिला भगिनींसाठी आनंदाची गोष्ट आहे.. त्याच बरोबर विरदेल गावाच्या नागरिकांना आता एकच अपेक्षा आहे की ही घंटा गाडी नियमित वेळेवर कायम स्वरुपी सुरू ठेवली पाहिजे व गावातील व परिसरातील परिसर असेच स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत नवनवीन उपक्रम राबविले जावेत.. व त्याचबरोबर आज
दोंडाईचा येथे घंटागाडीची चाबी देतांना आदरणीय नामदार जयकुमार भाऊ रावल व
विरदेल गावातील सामाजिक कार्यकर्ते सतीश गोटू बेहेरे, सरपंच सुवर्णा सतिश बेहेरे व उपसरपंच वैजंताबाई भगवान गावित शहाजी देवकर, एम.पी.पाटील सर, डॉ.किरण जोशी,जितू पेंढारकर,दीपक कुंभार, पियुष बेहेरे,भगवान गावित गावातील सर्व सन्माननीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

109
2287 views