logo

संतपूजन सोहळा – सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर, श्रीक्षेत्र पंढरपूर आमचा वारकरी हाच VIP ! - उप मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे

संतपूजन सोहळा – सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर, श्रीक्षेत्र पंढरपूर

आमचा वारकरी हाच VIP ! - उप मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे

कार्तिक एकादशीच्या पवित्र महापर्वानिमित्त श्रीपांडुरंग-रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाल्यानंतर राज्यातील तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर क्षेत्रातील सकल ज्येष्ठ कीर्तनकार, संत साहित्य अभ्यासक आणि संत वंशज यांचा संतपूजन सोहळा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते श्रद्धापूर्वक पार पडला.

अनेक वर्षे देवाची पूजा केल्यानंतर संतांच्या पूजेचा मानस आदरणीय शिंदे साहेबांच्या मनी होता. या भावनिक संकल्पनेतून “वारकरी हाच आमचा VIP आहे” हा संदेश देत त्यांनी संत परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प. पू.श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांनी उपस्थित सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त करत आशीर्वाद दिले.

या भव्य सोहळ्याचे संयोजन शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना तर्फे करण्यात आले. श्री.उमेशमहाराज बागडे यांनी वारकरी संप्रदायाची भूमिका व संप्रदायाचे एकनाथ शिंदेंवरील प्रेम याबद्दल मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी पूरग्रस्त भागातील १०० गावांना भजन साहित्य पखवाज, टाळ, वीणा व ग्रंथसंपदा भेट स्वरूपात देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभही मा. शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक पू. श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर,पु. गुरू श्रीचंद्रशेखरमहाराज देगलूरकर, श्रीगुरुराजमहाराज देगलूरकर, श्रीगुरु श्रीप्रमोदमहाराज जगताप यांच्यासह अनेक संतपरिवारातील मान्यवरांशी शिंदे साहेबांनी आत्मीय संवाद साधला. शेकडो वर्षांची संत परंपरा जपणाऱ्या या संतमंडळींशी पारिवारिक वातावरणात हितगुज साधण्यात आले.

संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत गंगूकाका शिरवळकर यांचे वंशज, संत निवृत्तीनाथ संस्थान व संत मुक्ताई संस्थान विश्वस्त, बडवे उत्पात परिवार, वारकरी फडकरी संघटना, वारकरी पाईक संघ, वारकरी संप्रदाय युवा मंच, अखिल वारकरी गुरुकुल संघ, सद्गुरू सेवा समिती आणि संत सेवा संघ यांचे प्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित होते

यावेळी मंत्री ना. श्री. भरतशेठ गोगावले, आमदार समाधान आवताडे, तसेच शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे सचिव श्रीराममहाराज माळी पदाधिकारी व संतप्रेमी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

25
2293 views