logo

*दिवा येथील अनधिकृत इमारतींवरील कारवाईत उर्वरित पाच इमारती रिक्त* *दिवा येथे अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई सुरू*

ठाणे (04) : मा. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक ४०५१/२०२३ मधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण दहा इमारतीपैकी तीन इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, उर्वरित सात इमारतींपैकी सोमवारी दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली. उर्वरित पाच इमारती आज (दिनांक ४ नोव्हेंबर) रोजी पूर्णपणे रिक्त करण्यात आल्या. ठाणे महापालिकेने पोलिस बंदोबस्त ही करण्यात आली.

आज करण्यात कारवाईत व्यवसायिक गाळे तोडण्यात आले तसेच सर्व पाचही इमारतींचे सदनिकांचे प्रवेशद्वार स्थानी असलेले दरवाजे तोडण्यात आले. या इमारतींवर निष्कासनाची कारवाई सुरू राहणार आहे.

या कारवाईस महापालिका उपायुक्त उमेश बिरारी, परिमंडळ उपायुक्त सचिन सांगळे, दिनेश तायडे, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सहाय्यक आयुक्त महेश जामनेर, सोनल काळे, सोमनाथ बनसोडे, विजय कावळे, गणेश चौधरी, सोपान भाईक आदी उपस्थित होते.

348
14812 views