logo

नाशिक ब्राह्मण महाकुंभ बैठक संपन्न

🕉️ नाशिकमध्ये “ब्राह्मण महाकुंभ २०२५” निमित्त प्रेरणादायी बैठक उत्साहात संपन्न 🚩
नाशिक, दि. २ नोव्हेंबर २०२५ — आगामी “ब्राह्मण महाकुंभ २०२५” या अखिल भारतीय भव्य कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात नाशिक येथे शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था सभागृहात एक प्रेरणादायी व उत्साहपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत जळगाव,छत्रपती संभाजीनगर, पुणे, आदी ठिकाणांहून आलेल्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
बैठकीला -उत्तर देशीय ब्राह्मण सेवा समिती संभाजी नगर सक्रिय सदस्या सौ विजया जी अवस्थी व उत्तर भारतीय ब्राह्मण समाज संस्था महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मोहनजी तिवारी यांनी आपले विचार मांडले
🎓 उपस्थित मान्यवर :
अध्यक्ष — पं. सतीश शुक्ल
उपाध्यक्ष — अॅड. भानुदास शौचे
कार्याध्यक्ष — तुषार जोशी
सहकार्यवाह — अॅड. प्रणिता कुलकर्णी
शिक्षण समिती प्रमुख — राजन कुलकर्णी
शिक्षण समिती सदस्य — रोहिणी कुलकर्णी
विशेष निमंत्रित — दीपक कुलकर्णी, अनिता कुलकर्णी
गुजराती ब्राह्मण समाज अध्यक्ष — शामसुंदर जोशी
राजस्थानी विप्र समाज अध्यक्ष — पं. महेश शर्मा
छत्रपती संभाजीनगरहून — सौ. विजया अवस्थी, सौ. दीपा मिश्रा, अनिल कुमार तिवारी
पुण्याहून — नवीन अवस्थी, संजय दुबे, रुपेश तिवारी, कैलाश दुबे
जळगावहून — मोहनजी तिवारी
तसेच मान्यवर उपस्थित —
पं. संदीप तिवारी, पं. जगदीश पांडे, बन्सीलाल मिसर, शामप्रसाद पांडे,
ज्योती दुर्गेश तिवारी, अनिता तिवारी, कल्पना तिवारी, वैष्णवी बाजपेयी आदी समाजबंधू भगिनी.
---
सौ. विजया अवस्थी यांनी “ब्राह्मण महाकुंभ २०२५” चे उद्दिष्ट, कार्यक्रमाचे स्वरूप व राष्ट्रीय एकतेचा संदेश याबाबत सविस्तर माहिती दिली.
त्यांनी सांगितले —
> “ब्राह्मण समाज हा ज्ञान, संस्कार आणि सेवेच्या त्रिसूत्रीवर आधारित असून, सर्व शाखा, गोत्र, भाषा व प्रांतातील बांधवांनी संघटित होऊन समाजविकासासाठी हातभार लावावा. संघटित समाज कोणतीही उंची गाठू शकतो.”

पं. सतीश शुक्ल यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात नमूद केले —
> “ब्राह्मण समाज हे राष्ट्राचे बुद्धिकेंद्र आहे. शिक्षण, संस्कार आणि उद्यमशीलतेद्वारे समाजाचा विकास साधणे हीच खरी ब्राह्मण परंपरा आहे.
‘एक ब्राह्मण – नेक ब्राह्मण, संघटित ब्राह्मण समाजाचाच विकास!’ — हा संदेश घेऊन प्रत्येक बांधवाने कार्यरत व्हावे.”--
🎯 महाकुंभाचे प्रमुख उद्देश :
🔹 सर्व प्रांत, गोत्र, भाषा आणि शाखांतील ब्राह्मण समाजाला एकत्र आणून ऐक्य आणि अभिमान वाढविणे।
🔹 युवकांना शिक्षण, संस्कार व स्वरोजगारासाठी प्रोत्साहन देणे।
🔹 विवाह, शिक्षण, संस्कृती आणि उद्योजकता क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविणे।
🔹 धर्म, राष्ट्र आणि समाजहितासाठी संघटितपणे कार्य करणे।
अॅड. भानुदास शौचे यांनी या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
बैठकीत सर्व मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
सौ. विजया अवस्थी यांनी आवाहन केले —
> “आपण नोकरी मागणारे नव्हे, तर रोजगार देणारे बनले पाहिजे.
संघटित समाज कोणतीही उंची गाठू शकतो
ह्या २‌ दिवशीय महाकुंभ ब्राह्मण अधिवेशना साठी संपुर्ण महाराष्ट्रात उत्तर देशीय ब्राह्मण सेवा समिती चे सौ विजाजी अवस्थी उत्तर भारतीय ब्राह्मण समाज संस्था महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मोहनजी तिवारी बैठकीचे नियोजन आणि संर्पक करित आहे

24
3034 views