logo

क्रिस्टल कंपनीची दिवाळी आणि कामगारांचा शिमगा, मिरज सिविल मधील प्रकार.

मिरज सिविल मध्ये क्रिस्टल कंपनी चे टेंडर वरती जे कामगार काम करतात त्यांना दिवाळीचा बोनस देतो म्हणून आशेवर लावून ठेवले व दिवाळी झाली तरी बोनस दिला नाही व कामगारांना उडवा उडवीची उत्तरे दिली जाऊ लागली ज्यावेळी क्रिस्टल कंपनीचे मॅनेजर साहेबांना कॉल करून विचारण्यात आलं त्यावेळी दिवाळीच्या अगोदर होणार आहे लक्ष्मी पूजेच्या अगोदर होणार आहे तारीख वर तारीख दिली गेली पण अद्याप दिवाळी उलटून 20,25 दिवस झाले तरीही अजून दिवाळीचा बोनस झाला नाही व पेमेंट ही वेळेत होत नाही. जर असं होत असेल तर कामगारांनी घर कसे चालवायची व येण्या जाण्यासाठी त्यांना पैसे कुठून मिळणार अशा कंपनीला टेंडर देऊन मिरज सिविलने खूप मोठी चूक केली आहे का कामगारांचा बोनस झाला तर ठीक आहे नसेल तर यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी यासाठी ऑल इंडिया मीडिया असोसिएशन सांगली जिल्हाध्यक्ष यांच्या मार्फत मनसे कामगाराध्यक्ष यांना एक लेटर देऊन क्रिस्टल कंपनी वरती कारवाई करण्यासाठी व कामगारांसाठी सदैव तत्पर राहील.

94
4061 views