logo

अश्वयुगच्या सोलो डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर ऑनलाइन स्पर्धेतील स्पर्धकांना चार लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस वितरण

शिरूर प्रतिनिधी - अभिनेत्री अश्विनी इरोळे यांनी तीन वर्षांपूर्वी अश्वयुग महिला मंच सुरू केला. या मंचमध्ये या तीन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रातून ३६ हजारांपेक्षा जास्त महिलांनी सभासद म्हणून नावनोंदणी केली आहे. मंचाद्वारे आजपर्यंत अनेक मोठमोठे उपक्रम राबविले असून यावर्षी तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी चार लाख ५० हजार रुपयांचे बक्षिसे असलेली ऑनलाइन सोलो डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वात जास्त बक्षीस असलेली स्पर्धा ठरली आहे. त्याचे बक्षीस वितरण नुकतेच झाले.
राज्य आणि राज्याच्या बाहेरून या स्पर्धेमध्ये २४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा शुक्रवार ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी शिरूर (जिल्हा पुणे) येथे १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेमध्ये रायगडची दृष्टी महेंद्र ठाकूर, पिंपरी चिंचवडची इषिता बरवड, वणीची रिद्धि ऋषि राऊत, अकोले ची कृपा वाकचौरे, सिंधुदुर्गची नेहा जाधव, पल्लवी लोंढे हे पहिल्या क्रमांकाचे विजेते ठरले असून दुसऱ्या क्रमांकामध्ये बीडची सायली संजय टाकळकर, रायगडची प्राची ठाकूर, सावंतवाडीची स्वरांगी खानोलकर, कोल्हापूरची नव्या कल्याणकर, पुण्याचा अर्णव पवार, बारामतीची अन्वी पिसाळ हे तिसऱ्या क्रमांकावर होते. पुण्याची चार्वी गणेश चालखोर, पेनची आरोही पाटील, माहिरा मनोज अडवाणी, रायगडची श्रावणी म्हात्रे, अहिल्यानगरची समीक्षा तनपुरे तसेच उत्तेजनार्थ मध्ये एकूण ५० विजेते ठरले.

महिला मंचच्या संस्थापिका, अध्यक्षा अभिनेत्री कोरीओग्राफर अश्विनी भाऊसाहेब इरोळे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. तळागाळातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना कलेमध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी, फक्त आणि फक्त हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अश्वयुग महिला मंचच्या वतीने ही स्पर्धा राबवण्यात आली होती. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या निळावंती एक रहस्य या चित्रपटाचे अश्वयुग फिल्म प्रोडक्शन आणि अश्वयुग अॅडव्हर्टायजिंग एजन्सी इव्हेंट्स, नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट शिरूर यांनी स्पर्धेला प्रायोजक म्हणून काम पाहिले.

बक्षीस वितरण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी अश्वयुग महिला मंचच्या सदस्या देवा वेन्लेस क्लब शिरूरच्या सुरेखा पोटघन, सदस्या रूपाली चौधरी, मनीषा खुपटे, विकास गायकवाड, संजू भंडारी, अविनाश आढाव यांनी कामे सांभाळली तर सरस्वती कटके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अश्वयुग महिला मंचचे मार्गदर्शक लेखक, दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे यांनी या सर्व स्पर्धेला सुरवातीपासून मोलाचे मार्गदर्शन केले.

54
8943 views